स्वप्नातलं मातीचं घर...
तसं पाहिलं तर आपल्या मनात अनेक इच्छा , आकांक्षा , स्वप्न दडून राहिलेली असतात ... हे करावं , ते बघावं , इकडे जावं , तिकडे तो देश, प्रांत बघावा... आपलं एखादं घर असावं ( हे ही आता अनेकांसाठी स्वप्नच होऊ लागलं आहे!), किंवा गावाकडे आपलं एखादं घर असावं , शेत असावं वगैरे वगैरे ... या इच्छा प्रत्यक्षात आणणं कधी जमतं तर कधी नाही . छोट्या छोट्या सहज जमतील अशा इच्छा त्यामानाने लवकर पूर्ण होतात , किंवा जिथे पैसे टाकून काही करायचं असेल ( गाडी घेणे, युरोप बघणे किंवा हिमालयातला ट्रेक करणे ) अशा गोष्टी त्यामानाने सहज होऊ शकतात पण गावाकडे शेती आणि शेतामध्ये आपले घर असावे असं स्वप्न मात्र खरं होणं ( शहरातल्या जीवांसाठी ) जरा अवघड आहे !! ( बऱ्याचदा त्यासाठी आपण काही खास efforts ही घेत नाही, स्वप्न पाहण्यातच धन्यता मानतो! ) नोकरी किंवा पैसे कमवण्याचं काय ? ...