Posts

Showing posts from May, 2023

कधीच घडू नये अशी एक गोष्ट!

Image
  ( २०५० सालचा एक दिवस ) ऋषी असा का वागतोय   काही समजतच   नाहीये !  गेला आठवडाभर पहाते आहे मी , काही तरी खूप बिनसलंय ...  मी बोलायचा प्रयत्न करते आहे आणि तो सारखा टाळतो आहे , चिडचिड करतो आहे . आज मी त्याच्यासाठी कॉफी घेऊन खोलीत गेले तर खेकसलाच माझ्यावर ! काय सारखी डिस्टर्ब करतेस आई , बाहेर जा !! धक्काच बसला मला ! मानसी नवऱ्याला सांगत होती . रात्री गादीत पडल्यावर   दोघांचे मोबाईल बाजूला जाऊन बोलायला मिळेल अशी संधी अलीकडे फार कमीवेळा मिळायची . नवीन जॉब आहे  गं ... काही तरी टेन्शन असेल ऑफिसमध्ये ... त्याला सेटल व्हायला वेळ द्यायला हवा . समीरने मानसीची   समजूत काढायचा   प्रयत्न केला ... पण त्यालाही   जाणवत होतं  की  आपला मुलगा कुठल्यातरी जबरदस्त स्ट्रेस मध्ये आहे . ऋषी हुशार आणि अगदी बॅलन्सड मुलगा ... एवढ्या परीक्षा दिल्या , शाळेत कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा जिंकल्या ... असा स्ट्रेसमध्ये   कधीच   दिसला नव्हता ... ...