Kahi varshan pasun Vivek ani Jasmin ( Joglekar) "Taasgav la yaa Gandhi...." mhanun agraha karat hote...
Mazi pan eccha hoti pan workout hot navhta.
Ya veli sagla neat julun ala ani me 4-5 diwas rahanya sathi jaaycha tharavla.
Gammat ashi ke jatana car madhe donhi computers, monitor etc maza sagla dukaan taakla ani sutlo Punyaatun Tasgav kade! :-)
Gaavaatlya gharaat rahaycha ke malyaatlya he net connectivity milnya var depend hota.
Gavaatlya peksha malyaat net connectivity changli milali ani amhi ek table occupy karun aamcha dukaan mandla!
Hey malyaatla ghar ( farm house) atishay sundar bandla aahe.... Ata khalche photo pahile ke lakshaat yeilch!
Tithe Vivek che aai-baba ani motha bhau Vishwasdada rahataat.
Aaju bajula draksha chya baga... Peru, chikku, ramfal, naral, chinch, ambe, awlya chi zada....
Baajri, gahu, harbhara, usachi sheti....
Vegveglya bhaajya...
Gammat sangu.... me ata "Online" shabdacha veglach artha anubhavat hoto.
Chikku, peru, draksha toda ani kha....
Veg-veglya bhajya... Shravani ghevda, kothimbir, laal math, limbu toda ani bhaji kara...
Sagla ekdum fresh ani taste la bhaaari... kharya artha ne Online!
Fortunately tithe basun maza kaam pan chalu hota... so client chya drushti ne me Punyaat ch hoto... Online! :-)
Ani bhajya, fruites enjoy karat, lights gelya var shetaat chakkar marat... choti choti kama karun madat karat, shantata anubhavat me hey asa Online asna jaam enjoy karat hoto!




 |
| विश्वास दादांच्या मागे स्कुटीवर बसून द्राक्षांच्या शेतातून आम्ही भूर्र्र्कन जात होतो... आणि द्राक्षांचे घड डोक्याला आपटू नये म्हणून मी वाकत होतो... हा जबरी अनुभव घेत हसत होतो... की कसे पुण्यात आपण गर्दीतून, गाड्यांमधून वाट काढत जात असतो आणि इथे द्राक्षांच्या घडांमधून! :-) | | |
 |
| सगळं काही Online बघा....! तोडा.. धुवा... आणि खा....! |
 |
| गव्हाच्या ओम्ब्या... या ओम्ब्यांवरून हात फिरवत जायला मजा येते.... |
 |
| हे लिम्बाच झाड आहे! रंग संत्र्याचा घेतलाय! |
 |
| चिंचेची भली मोठ्ठी झाडं पहिली की लहानपण आठवत... दगडं मारून चिंचा पाडणे... झाडांवर उगीच चढणे .. सूर-पारंब्या खेळणे... चिंचेची कोवळी पानं खाणे... आणि आता हे झाड दिसलं की दर वेळी वाटतं.. एखादं घुबड विसावलेलं दिसेल कदाचित! एकदा रात्री ११:३० ला विश्वास दादा आले आणि म्हणाले... जागा आहेस का?! बाहेर येतोस? घुबडाच hooting ऐकू येतंय....! खूप वेळ थांबलो आम्ही... पण पठ्ठ्याने परत आवाज दिला नाही! |
 |
| बगळेबुवा उगाच style मारत बसले होते! :-) |
 |
| आणि white-eyed buzzard ने तिथे nesting सुरु केलं आहे असं कळलंय... |
 |
| विश्वास दादा... अतिशय कष्टाळू, प्रचंड वाचन आणि शेतीचं उत्तम ज्ञान... बोलण्यात जरब आणि वागण्यात आपलेपणा... स्वयंपाक उत्तम करतात... पक्ष्यांची बारीक माहिती आणि रात्रीच्या अंधारात सांगतात... ' मांजर नाही खोकड आहे शेतात!' |
 |
| आणि विश्वासदादांची लाडकी, त्यांचा प्रत्येक इशारा, शब्द समजणारी.... त्यांची वेडी पोरगी एल्सा! विश्वासदादांना कुत्र्याविषयी प्रचंड प्रेम आणि ज्ञान आहे... उत्तम ट्रेन केलं आहे त्यांनी तिला... जर्मनी वरून आणली आहे ही 'वेडी पोरगी'. मी काम करत असताना मधेच जवळ यायची आणि काम खूप झालं आता जरा माझे लाड करा असं दाखवून लाड करून घ्यायची... मी पाहुणा आहे आणि इथेच राहणार आहे असं विश्वास दादांनी सांगितल्यावर तिने ते नीट accept केलं होतं... :-) |
 |
| या मळ्यामध्ये सकाळ फार छान असायची... हलकासा गारवा... एक रम्य शांतता... मधूनच येणारा grey partridge चा आवाज ... उगवणारा सूर्य.... आणि.. |
 |
| न चुकता त्याला नमन करून आपला वानप्रस्थाश्रम भरभरून जगणारे विवेक, विश्वासदादांचे बाबा... पहाटे लवकर उठतात... लिखाण करतात... रामायणाचा मराठीत अनुवाद करून तयार आहे आणि आता महाभारतावर काम चालू आहे... काकांनी कोयनेच्या power plant phase २ & 3 चं design, drawing and execution केलेलं आहे! त्यानंतरही सांगलीमध्ये एका संस्थेमार्फत Bio Gas Plants आणि इतर ही खूप निसर्गाभिमुख उपक्रम राबवले आहेत... सकाळी सूर्य दर्शना नंतर योग, प्राणायाम, पाणी तापवणे... झाड-लोट करणे... स्वतः चे कपडे स्वतः धुणे, वाळलेल्या फांद्या गोळा करून आणणे... कोणी पाहुणे आले असतील तर त्यांना मळ्यात फिरवून आणणे, चिक्कू, रामफळ वगैरे काढून देणे... काय काय करतात! आणि गाणी म्हणत... ' बरका....' अशी हाक काकूंना मारत काही तरी गोष्टी discuss करत असतात... माणसाने वयाचा विचार न करता आनंदी, सुखी, समाधानी, स्वावलंबी आणि इतरांना दिशा दर्शक कसं राहावं याचं उत्तम उदाहरण आहेत काका. |
 |
| आणि या काकू... अथक काम करत असतात... मळ्यात राहतोय.. वेळ मोकळा आहे म्हणून Tv बघत बसल्या आहेत... असं कधीच नाही.... उलट यांना वेळ मोकळा मिळतो का असाच प्रश्न मला पडायचा... रोज न चुकता वेग-वेगळी फुलं वेचून आणायच्या... बकुळीची फुलं वेचत केवढा वेळ रमलेल्या असायच्या... मग त्यांचे गजरे कर.. शिरीन ताई ( कडेवर बसलेल्या) आल्या की त्यांना घालणे... त्यांचे लाड पुरवणे... प्रत्येकाच्या वेळा, आवडी-निवडी जपणे.. भन्नाट जेवण बनवणे... भाजी आमटी बरोबरच कसलं न कसलं लोणचं बनवणे... वाचन करणे.. सगळ्यांसाठी भरभरून करणे.... किती काय काय events चालू असायचे....! मी त्यांना कधी दमलेलं पाहिलंच नाही! |
 |
| आणि या शिरीन ताई....! दुधावरची साय.... आणि साधी साय नाही... गोडवा भरभरून....!! बोट धरून माझ्या बरोबर मळ्यात इकडे तिकडे फिरणार.... ' मामा... तुला आवडलं का रे आमचं गाव? तू रहातोस का इथेच?! तू नको ना जाउस...' म्हणत.... ' मामा मला फुदा फुदवून देतोस का?' म्हणून फुगे फुगवून घेत सारख्या आजू-बाजूला रुंजी घालत असायच्या... तासगाव छोटंसं असल्यामुळे घरा समोरच शाळा.. सो यायला जायला रिक्षा, प्रदूषण, pressures नाहीत... आता हा क्लास मग तो क्लास... असं ही नाही... वेळ मिळाला की मळ्यात पाळायच आणि तिथे आजी-आबांबरोबर फिरायचं... फुलं वेचायची... मोर बघायचे... काही तरी छुट-पुट कामं करून मदत करायची नाही तर एखादं काम वाढवून ठेवायचं! :-) स्वच्च्छ हवा.. घरात मोकळं, आनंदी वातावरण.. अभ्यास, शाळा, क्लास, competition असली pressures नाहीत मात्र लाड पुरवायला आजी-आजोबा आहेत... अजून काय हवं!? :-) |
 |
| चुलीवर पाणी तापवण्याचा कार्यक्रम माझा आवडता होता... वाळलेल्या फांद्या, काड्या जमा करून ठेवलेल्या... एक फुकणी आणि काडेपेटी... लगे रहो! :-) किती वर्षांनी धुरामुळे माझ्या डोळ्यातून पाणी आलं! इथे देखील प्रत्येक गोष्टीचा sequence आणि system होती... :-) |
 |
| तासगावात एक जुनं, फार भारी मंदिर आहे... गणपती चं... मी विवेक च्या गावातल्या घराच्या गच्ची वरून याचं गोपूर पाहिलं आणि उडालोच! म्हणलं,' हे एवढा भारी, रेखीव गोपूर इथे कुठून आलं!?' मग त्याच दिवशी मंदिर पाहून, गणपतीचं दर्शन घेऊन आलो... दगडा वरचं काम रेखीव आहे, रंगकाम पण उत्तम आहे... त्या नंतर आम्ही सांगलीचं गणपती मंदिर ही पाहिलं... ते पण सुंदरच आहे... माझ्या दृष्टीने सांगलीचं मंदिर म्हणजे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिके सारखं आहे... नीट नेटकं, भारदस्त... आदर, आत्मीय वाटावं असं... पण तासगावचं मंदिर मात्र... आई सारखं आहे... आपलं वाटतं... तिथे सारखं जावसं वाटतं ! |
 |
| तर अशी झाली आमची तासगाव ट्रीप! आणि पुण्याच्या बाहेर असूनही कामावर हजर असणं... आणि कामावर हजर असून ही शेतात राहायची, मोकळेपणे भटकायची, शेती कश्याशी खातात बघायची संधी मिळाली... विवेक आणि जस्मिन यांच्या आग्रहामुळे मी हे सगळं बघू शकलो... एक वेगळंच online जगू शकलो... :-) |